सीबीआयच्या ताब्यातले १०३ किलो सोने गायब !

राज्य सरकारचा गुन्हे अन्वेषण विभाग करणार चौकशी

CBI & Gold

चेन्नई : घोटाळ्यांच्या तक्रारींच्या चौकशीसाठी प्रसिद्ध असलेल्या सीबीआयमध्येच मोठा घोटाळा झाला आहे. जप्त केलेल्या सोन्यातील १०३ किलो सोन्याची चोरी झाली आहे. या सोन्याची किंमत सुमारे ४५ कोटी आहे. न्यायालयाने या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले असून तामिळनाडू राज्य सरकारचा गुन्हे अन्वेषण विभाग ही चौकशी करणार आहे. (CBI custody Gold Missing inquiry order by court)

सीबीआयने २०१२ मध्ये तामिळनाडूतल्या सुराणा कॉर्पोरेशनवर धाड टाकली होती. ४०० किलो सोने जप्त केले होते. तेव्हापासून ते सीबीआयच्या ताब्यात होते. आता तपासणीत या सोन्याचे वजन केले; सुमारे १०३ किलो सोने कमी भरले !

प्रकरण कोर्टात पोहचले. कोर्टाने सीबीआयच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकशी सीबी-सीआयडी म्हणजेच राज्य सरकारचा गुन्हे अन्वेषण विभाग करणार आहे. सीबीआयने या चौकशीला विरोध केला. मात्र कोर्टाने कडक शब्दांत फटकारले व ही चौकशी एसपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीत सीआयडी करेल, असे सांगितले. चौकशी सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER