कोरोना रुग्णांसाठी २-डीऑक्सी-डी-ग्लूकोजचे १० हजार डोसेस आजच मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली :- करोना विषाणूची (Corona Virus) दुसरी लाट देशात विनाश करत आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीकरण सुरू आहे. मात्र देशात लोकसंख्येच्या तुलनेत लसीचा तुटवडा जाणवत आहे. अशातच डीआरडीओने विकसित केलेले अँटी-कोविड (Anti-covid) औषध २-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-deoxy-D-glucose) (२-डीजी) चे १० हजार डोसेज आज किंवा उद्या मिळण्याची शक्यता आहे.

हे औषध संरक्षण आणि संशोधन विकास संस्थेने तयार केले आहे. या औषधामुळे कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची फारशी गरज भासणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार २ डेक्सोय डी ग्लुकोजच्या रुग्णांना दिलं गेलं ते रुग्ण वेगानं रिकव्हर होतात. त्याचा बरा होण्याचा वेग नियमितपणे केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीपेक्षा चांगला असल्याचा दावा कऱण्यात आला आहे. नियमित उपचार पद्धतीनं रुग्ण बरा होण्यासाठी लागणारा वेळ आणि २ डेक्सोय डी ग्लुकोज दिलेले रुग्ण बरे होण्याचा वेळ यांच्यामध्ये जवळपास २.५ दिवसांचा फरक आढळून आल्याचं डीआरडीओकडून सांगण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button