निवडणुकीत EVM-VVPATची जुळणी १०० टक्के; निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब

election commission of india - Maharashtra Today

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत ‘इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन’ आणि ‘वोटर वेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रेल्स’चे एकत्रीकरण १०० टक्के झाले आहे. या मशिन्स निष्पक्षपणे काम करत असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले की, डेटामध्ये EVM-VVPATची जुळणी १०० टक्के राहिली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून या सर्व मशीन पूर्णपणे निष्पक्षपणे काम करत असल्याचे सिद्ध झाले आहे. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि आसामव्यतिरिक्त केंद्र शासित प्रदेश पाँडिचेरी येथे निवडणुका पार पडल्या. १९८९मध्ये भारतीय निवडणूक आयोगाने ईव्हीएम विकसित केला होता. तर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात VVPAT यूनिटचा वापर सुरू झाला.

यानुसार VVPAT स्लिपची पुन्हा तपासणी करणे आवश्यक आहे. दुसरीकडे पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला VVPATच्या जुळणीसाठी पत्र लिहिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button