मुंबई पोलिसांना १०० कोटींचे टार्गेट! तर महापालिकेचे किती असेल? मनसेचा चिमटा

Uddhav Thackeray & Raj Thackeray

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिन वाझे याना १०० कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट (100 crore target for Mumbai police) दिले होता, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh)यांनी केला. यावर नाव न घेता मनसेने शिवसेनेला चिमटा काढला, मुंबई पोलिसांना १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट सरकारने दिले होते. मग मुंबई महानगरपालिकेला किती पैसे वसूल करण्याचे टार्गेट असेल?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विट करून शिवसेनेला (Shivsena) चिमटा घेत म्हटले आहे की, हीच ती वेळ वीरप्पन गँगला कायमचं क्वारंटाईन करण्याची.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, राज ठाकरे यांनीही शनिवारी ट्विट करुन परमबीर सिंग यांच्या पत्राविषयी काळजी व्यक्त केली होती. परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र अत्यंत धक्कादायक आहे. ही घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER