100 कोटींची महावसुली 300 कोटींवर? अनिल परब यांनी राजीनामा द्यावा ; मनसेची मागणी

Maharashtra Today

मुंबई :- परिवहन विभागातही महावसुली सुरू असल्याची तक्रार नाशिकमध्ये दाखल करण्यात आली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. 100 कोटीची महावसूली आता 300 कोटीवर? परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या विभागाचे अधिकारी पाटील यांची नाशिक पंचवटी पोलिस स्टेशनात तक्रार. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील किमान निष्पक्ष चौकशी करणार का?, असा सवाल देशपांडे यांनी ट्विटमधून केला आहे.

परिवहन विभागातही महावसुली सुरू असल्याची तक्रार नाशिकमध्ये दाखल करण्यात आली आहे. गजेंद्र पाटील यांनी या महावसुली विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाटील हे नाशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते. पाटील यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पंचवटी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना दिले आहेत. पाटील यांनी परिवहन विभागात बदल्यांचे रॅकेट कसं चालतं याचा पर्दाफाश आपल्या तक्रारीत केला आहे. उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे बदल्या मॅनेज करत असून अर्थपूर्ण व्यवहार करत आहेत. त्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांचं अभय आहे, असा दावा पाटील यांनी तक्रारीत केला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button