१०० कोटी फक्त मुंबईच्या ‘वसुलीचे टार्गेट’ तर राज्याचे किती? ही तर महालूट आघाडी !

Ravi Shankar Prasad

दिल्ली : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. असा आरोप मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी केला. यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी पत्र परिषदेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली व या सरकारला प्रश्न विचारला – १०० कोटी फक्त मुंबईच्या ‘वसुलीचे टार्गेट’ तर राज्याचे किती?

या सरकारने सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. हे महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) नसून ही महालूट आघाडी आहे. या सरकारच्या वसुलीसाठी पोलीस खात्याचे फक्त मुंबईचे टार्गेट १०० कोटी आहे तर पूर्ण राज्यासाठी किती असेल आणि असे सर्व खात्यांचे किती असेल, असा प्रश्न त्यांनी केला. या भ्रष्ट महाविकास आघाडी सरकारच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी (BJP) रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रसाद यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER