१०० कोटींची ऑफर! शशिकांत शिंदेंचा दावा हा सर्वात मोठा राजकीय विनोद, मुनगंटीवारांचा टोमणा

Sudhir Mungantiwar & shashikant shinde

चंद्रपूर : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना मला भाजपात पक्ष करण्यासाठी १०० कोटींची ऑफर देण्यात आली होती, प्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा दावा सर्वात मोठा राजकीय विनोद आहे, असा टोमणा भाजपाचे नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मारला.

शशिकांत शिंदे यांनी आज हा खळबळजन\क दावा केला. यावर शिंदे यांची टिंगल करताना मुनगंटीवार म्हणालेत, शशिकांत शिंदे यांना निवडणूक खर्चाविषयी ज्ञान नाही. ते कोरोना नंतरचा सर्वात मोठा राजकीय विनोद करत आहेत!

“मला आश्चर्य वाटते निवडणूल लढवायला २८ लाखांपेक्षा जास्त खर्चच करता येत नाही. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी शंभर कोटींची ऑफर दिली असं सांगणं म्हणजे त्यांना याबाबत ज्ञान नाही, असा अर्थ काढायचा किंवा शशिकांत शिंदे कोरोना संकटानंतरचा या वर्षातला सर्वात मोठा जोक मारत आहे, असा अर्थ पकडायचा”, असे मुनगंटीवार म्हणालेत.

शशिकांत शिंदे हे राज्यातील प्रमुख मराठा नेते आहेत. पवार कुटुंबीयांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्ह्यातील राजकारणात त्यांचा दबदबा आहे. कोरेगाव मतदारसंघातून ते दोनदा विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचे विधानपरिषदेत पुनर्वसन करण्यात आले होते. मुंबई आणि नवी मुंबईतील माथाडी कामगारांचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER