शतप्रतिशत भाजपा! गुजरातमध्ये सर्व जिल्हा परिषदात उमलले कमळ

BJP Flags

अहमदाबाद : गुजरातमध्ये झालेल्या जिल्हा परिषद, आणि नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने (BJP) दणदणीत यश मिळवले. सर्व ३१ जिल्हा परिषदा जिंकल्या! २३१ पंचायत समित्यांपैकी १९६ पंचायस समित्यांमध्ये बाजी मारली व ८१ पैकी ७७ नगरपालिकांमध्ये सत्ता मिळवली.

काँग्रेसला (Congress) ३३ पंचायत समित्या आणि ४ नगरपालिकांमध्ये विजय मिळाला. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीतही भाजपाने सर्व ६ मनपा जिंकल्या आहेत.

मतमोजणीत सर्व ३१ जिल्हा परिषदांमध्ये भाजपाने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला एकाही जिल्ह्यात सत्ता मिळवता आली नाही. नगरपालिकांच्या निकालांमध्येही भाजपाचाच आघाडीवर होती. ८१ पैकी ७७ नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता मिळवली. काँग्रेसला ४ नगरपालिकांमध्ये विजय मिळाला.

सर्वत्र काँग्रेसचा सफाया होत असताना ‘आप’ने गुजरातच्या ग्रामीण भागांमध्येही प्रवेश करण्यात यश मिळवले आहे. काही ठिकाणी आपचे उमेदवार विजयी झाले होते.

दरम्यान, गेल्या आठवड्यात महानगरपालिका निवडणुकींमध्ये भाजपाने अहमदाबाद, बडोदा, सूरत, राजकोट, जामनगर आणि भावनगर या सर्व महानगरपालिका जिंकल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER