दानीची ‘कॉर्नर किक’ जाते सरळ गोलमध्ये !

Dani's 'corner kick'

मुंबई : केरळमधील दानी पी. के. हा १० वर्षांचा फुटबॉल खेळाडू कॉर्नर किक सरळ गोलमध्ये मारतो. त्याच्या या किकचा व्हीडीओ भारताच्या फुटबॉल संघाचे माजी कर्णधार आय.एम. विजयन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

हा व्हीडीओ ‘ऑल केरला किड्स फुटबॉल टुर्नामेंट’ स्पर्धेच्या अंतिम सामन्यातला आहे. दानीच्या संघाला कॉर्नर किक मिळाली आणि दानीने चेंडू सरळ गोल पोस्टमध्ये टाकला ! या स्पर्धेतील त्याने १३ गोल केले. त्याला ‘प्लेअर ऑफ टुर्नामेंट’ पुरस्कार मिळाला आहे. दानी केरळ फुटबॉल ट्रेनिंग सेंटर क्लब (केएफटीसी) तर्फे खेळतो.

शाहिद आफ्रिदीला पाचवे ‘कन्यारत्न’

फुटबॉलमध्ये कॉर्नर किक सरळ गोलमध्ये मारणे हे विशेष कौशल्य आहे. डेव्हिड बॅकहॅम, लिओनेल मेसी सारख्या जागतिक पातळीवरच्या खेळाडूंने हे कौशल्य दाखवले आहे. मैदानाच्या एका कोपऱ्यावरून गोलपोस्टमध्ये फुटबॉल टाकणे ही सोपी गोष्ट नाही.