नालासोपाऱ्यात १० वर्षे जुनी इमारत कोसळली, जीवितहानी नाही

Vasai Building Collapsed

वसई : नालासोपाऱ्यात (Nala Sopara) पूर्वेकडील संकेश्वर नगर येथील साफल्य नावाची चार मजली इमारत अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. रहिवाश्याना इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच सर्व तात्काळ बाहेर निघाल्याने मोठा अनर्थ टळला असून, कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

नालासोपारा पूर्वेकडील संकेश्वर नगर येथे साफल्य नावाची इमारत आहे. ही इमारत १० वर्ष जुनी आहे. सोमवारी मध्यरात्री इमारतीचा काही भाग कोसळला. त्या आवाजाने इमारतीमधील रहिवासी जागे झाले आणि खबरदारी म्हणून संपूर्ण इमारत खाली करण्यात आली. मात्र अवघ्या काही वेळात म्हणजे दीडच्या सुमारास संपूर्ण इमारत कोसळली. इमारतींमधील रहिवाशी बाहेर आल्याने कुठलीही जीवित झाली नाही.

‘आम्हाला आवाज आल्याने आम्ही खाली आलो आणि काही वेळेत संपूर्ण इमारत कोसळली. आमचा सारा संसार ढिगाऱ्याखाली गेला, असे या इमारती राहणाऱ्या सीमा देवरुखकर या महिलेने सांगितले. इमारतीतील रहिवाशांचे संसार ढिगाऱ्याखाली येऊन त्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अग्निशमन दलाचे जवान व पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मलबा हटवण्याचे काम सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER