कोयना धरणात 24 तासात 10 टीएमसी पाणी

Koyna Dam

सातारा :- कोयना धरण (Koyna Dam) परिसरात दमदार पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मागील 24 तासात 10 टीएमसी पाण्याची आवक धरणामध्ये झाली आहे. सध्या धरणातील पाणीसाठा 65 टीएमसी इतका आहे.

कोयना धरण क्षेत्रात कोयना, नवजा, महाबळेश्वर, वळवण आदी ठिकाणी झालेल्या पावसामुळे छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून प्रतिसेकंद सरासरी 1 लाख 20 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. 105 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणात आता एकूण 65 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. हे धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे 40 टीएमसी पाण्याची गरज असून अशाप्रकारे पावसाचा जोर कायम राहिला तर येत्या आठवडाभरातच हे धरण पूर्ण क्षमतेने भरेल.

सध्या कोसळणार पाऊस आणि धरणाची साठवण क्षमता यांचा विचार करुन धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यताही व्यक्त होत आहेत. यामुळे कराड, सांगली परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ही बातमी पण वाचा : चांदोली धरणातून विसर्ग वाढला : सांगलीला धोका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER