
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय (BCCI) ने 2022 पासून आयपीएलमध्ये (IPL) 10 संघ खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबाद येथील वार्षिक सर्वसाधारण सभेत या निर्णयाला मंजूरी देण्यात आली. 2021 चे आयपीएल आठच संघांसह होईल पण 2022 ची स्पर्धा 10 संघांदरम्यान होणार आहे.
2028 च्या लाॕस एंजेल्स आॕलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या आयसीसीच्या प्रयत्नांना पाठिंब्याबाबत मात्र निर्णय घेण्यात आला नाही.
अधिकाधिक प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळावी आणि आयपीएलच्या पटलावर अधिक शहरे यावीत म्हणून अधिक संघांच्या समावेशाची गरज असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जश शहा यांनी भूमिका मांडली. याबाबतचे अधिकार आयपीएल संचालन मंडळाला देण्यात आले आहेत. ते आयपीएलमध्ये नऊ संघ असावेत की दहा याचा निर्णय घेतील.
एका राज्यात एकच फ्रँचाईजी असावी असाही निर्णय घेण्यात आला. यामुळे पुणे आपोआपच बाद झाले आहे. त्यामुळे विद्यमान संघाचे राज्य आता दावेदार नसतील. त्यामुळे अहमदाबाद, राजकोट, विशाखापट्टणम, कोची वा थिरुवनंतापूरम व लखनऊ यांची शक्यता वाढली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला