
यवतमाळ :- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या वक्तव्याचा निषेध करीत यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दानवे हे शेतकरीविरोधी नेते असून शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या दानवे यांची जीभ छाटणाऱ्यास १० लाख रुपये बक्षीस आणि लोकवर्गणीतून मिळालेले चारचाकी वाहन भेट देऊ, अशी घोषणा यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख संतोष ढवळे (Santosh Dhavle) यांनी केली.
दत्त चौकात झालेल्या या आंदोलनात रावसाहेब दानवे विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि पुतळ्याला चपलांनी बदडल्यानंतर त्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणारे शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला