रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी

Uddhav Thackeray - Maharastra Today

मुंबई : भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस या कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. या घटनेची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री म्हणाले, या दुर्घटनेतील जखमींवर तात्काळ उपचारासाठी परवानगी देण्यात आलेली आहे, त्यातील हे मॉलमधलं हॉस्पिटल आहे. राज्यभर जिथे शक्य तिथे कोव्हिड हॉस्पिटल्सना परवानगी दिली होती. या हॉस्पिटलला तात्पुरती परवानगी होती, येत्या १ तारखेला संपत होती. दुर्दैवाने हॉस्पिटलच्या खाली असलेल्या दुकान, तळमजल्यांना आग लागली. ती हॉ,स्पिटलपर्यंत आली. जे कोरोना रुग्ण दाखल होते, त्यातील बाहेर काढताना काहींचा मृत्यू झाला. अशा घटना झाल्यानंतर आपण जागे होतो, चौकशी होते.. या प्रकरणातही चौकशी करुन कारवाई करु… अशा घटना होऊ नयेत, म्हणून कमला मिलमध्येही आग लागली होती, अशा दुर्घटना होऊ नयेत, कोव्हिड सेंटर, जम्बो फॅसिलिटी सेंटरमधील स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिटच्या सूचना दिल्या आहेत. दुर्घटना टळल्या पाहिजे.

कोरोनाच्या संसर्गामुळे आपण मॉल, सेंटर्समधील वर्दळीवर बंधनं आणली आहेत. मात्र ही दुर्घटना घडली आहे, ज्यांचं कौटुंबीक नुकसान झालं आहे, त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. जर यात दिरघांई, दुर्लक्ष असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER