खडसेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे १० मुद्दे

Eknath Khadse

जळगाव : आज एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी घोषणा केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी आतापर्यंतची होणारी खदखद व्यक्त केली. भाजपावर रोष नाही फडणवीस यांच्यामुळे सोडतो आहे असे सांगितले.

खडसे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे १० मुद्दे

  • भाजपा उपेक्षित होता अशा कालखंडापासून आजपर्यंत मी भाजपाचे काम प्रामाणिकपणे केले. भाजपाबद्दल रोष नाही. बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे, असे म्हटल्यानंतर जे काही घडले ते महाराष्ट्राला माहीत आहे.
  • माझी अनेक वेळा चौकशी झाली. खोटे आरोप करण्यात आले. विनयभंगाचा आरोप केला. फडणवीसांनी स्वत गुन्हा नोंद करायला सांगितले.
  • छळ किती करावा याला मर्यादा नव्हत्या; तरी मी ते सहन केले. माझा दावा आहे, माझं रेकॉर्ड काढा. राष्ट्रवादी किंवा काँग्रेस आणि शिवसेनेनेही माझ्या राजीनाम्याची मागणी केली नाही. जर असे असेल तर मी राजकारण सोडेन.
  • मला चौकशीचा त्रास झाला. यापेक्षा मरणयातना चांगल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांनी मला नाईलाजांनी सांगितले, असे सांगितले.
  • फडणवीसांनी खालच्या स्तरावर राजकारण केलं
  • मी जे काही मिळवलं ते माझ्या हिंमतीवर मिळवलं
  • माझ्या अनेक चौकशा झाल्या, भूखंड हडप करण्याचे आरोप झाले, माझ्यावर खोट्या विनयभंगाचा खटलादेखील दाखल करण्यात आला. उद्या उठून बलात्काराचाही गुन्हा दाखल केला असता.
  • देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पोलीस स्टेशनला फोन केला आणि गुन्हा नोंद करायला सांगितलं.
  • पक्ष सोडू नये म्हणून चंद्रकांत पाटलांशिवाय कुणाकडूनही मनधरणी नाही
  • आयुष्यात मला काय मिळालं नाही मिळालं याचं दु:ख नाही. पण मनस्ताप झाला याचं जास्त दु:ख आहे. मी जे काही पद मिळवलं ते माझ्या ताकदीवर.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER