१२ मेपासून नाशिकमध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन

Nashik Lockdown - Maharashtra Today

नाशिक : राज्यात दररोज कोरोना संसर्गाचा प्रसार आणि रुग्णवाढ होत असल्याने राज्य सरकारने लॉकडाऊनसदृश कडक निर्बंध घातले आहेत. मात्र यावर हवा तो प्रतिसाद मिळताना दिसत नसल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार वेगानं होत असून, रुग्णसंख्या वाढत आहे. आधीच आरोग्य सुविधांवर अतिरिक्त ताण येत असून, त्यात नव्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर पडत आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावर कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्याकडे कल वाढला असून, नाशिक शहरातही १० दिवसांचा कडक केला जाणार आहे. १२ मेपासून हा लॉकडाऊन असणार आहे.

नाशिक शहरातील कोरोनाची स्थिती चिंता वाढवणारी असून, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. १२ मेपासून शहरात कडक लॉकडाऊन केला जाणार आहे. १० दिवसांसाठी लॉकडाऊन असणार आहे. १२ मे रोजी दुपारी १२ वाजता कडक लॉकडाऊनची सुरुवात होईल. त्यानंतर २२ मे रोजी दुपारी १२ वाजता लॉकडाऊनची मुदत संपेल. या कालावधीत सर्व सेवा आणि दुकानं बंद राहणार असून, फक्त हॉस्पिटल आणि मेडिकल सुरू राहणार आहेत. या काळात कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button