१०-१२ वीच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर; राज्य सरकारचा आणखी एक निर्णय

CM Uddhav Thackeray - Maharastra Today
CM Uddhav Thackeray - Maharastra Today

मुंबई : राज्यभरातील विद्यार्थी व पालकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना (Corona) संसर्गामुळे या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. याबाबतची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केली. आता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस, तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील (Ajit Pawar) उपस्थित होते. यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षा घ्यायच्या की नाही, यावर बरीचवेळ चर्चा झाली.

सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल, असा मुद्दा चर्चेत पुढे आला. अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी सोशल माध्यमाद्वारे हा निर्णय जाहीर केला.

शिक्षणमंत्री काय म्हणाल्या?

“गेल्या काही दिवसांपासून राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. दहावी-बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. सध्याच्या परिस्थितीत परीक्षा कशी द्यायची, हा सर्वांसमोर चिंतेचा विषय आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, दहावीची परीक्षा जून महिन्यात तर बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होईल. जेणेकरून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. आता इतर शिक्षण महामंडळांनीही महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय स्वीकारावा.” असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button