रामलीलेच्या संवादात ‘१ सेकंद’ आणि ‘हमारे टीम का बंदर!’ मनोज तिवारी झाले ट्रोल

manoj Tiwari

अयोध्या :- दसऱ्यानिमित्त सध्या अयोध्येत लक्ष्मण किला येथे रामलीला सुरू आहे. (२५ ऑक्टोबरपर्यंत) यात रावणाच्या दरबारात लंकादहनाच्या घटनेबद्दल बोलताना अंगद – ‘१ सेकंद’ आणि ‘हमारी टीम का बंदर’ शब्द वापरतो! यामुळे अंगदाची भूमिका करणारे मनोज तिवारी सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

भोजपुरी कलाकार व भाजपाचे खा. मनोज तिवारी (Manoj Tiwari) या रामलीलेत अंगदाची भूमिका करत आहेत. त्यांच्या तोंडी वाल्मीकी रामायणात ‘सेंकद’ आणि ‘टीम’ शब्द ऐकून श्रोते चाट झालेत. रामलीलेचे यू-ट्यूबवरून थेट प्रक्षेपण सुरू आहे. यामुळे मनोज तिवारी सोशल मीडियावर ‘सेंकद’ आणि ‘टीम’साठी ट्रोल होत आहेत.

या रामलीलेमध्ये मनोज तिवारी यांच्यासोबत गोरखपूरचे खासदार रवि किशन भरत, विंदू दारासिंग हनुमानाची भूमिका करत आहेत. अभिनेता रझा मुराद अहिरावण आणि शाहबाज खान रावण, असरानी नारदाच्या भूमिकेत काम करत आहेत. राकेश बेदी विभिषण झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER