पीएम केअर्स फंडातून एक लाख ऑक्सिजन उपकरणांची होणार खरेदी; पंतप्रधानांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली :- कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोबतच आरोग्य व्यवस्थेवरही मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. अनेक ठिकाणी औषध आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत अनेक देश मदतीला समोर आले आहेत. दरम्यान, ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘पीएम केअर्स फंडातून’ एक लाख ‘पोर्टेबल ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर’ खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधानांनी ‘पोर्टेबल ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर’ लवकरात लवकर खरेदी करून राज्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने राज्यांना यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

‘पीएम केअर्स फंड’ अंतर्गत याआधी मंजूर करण्यात आलेल्या ७१३ पीएसए ऑक्सिजनशिवाय ५०० नव्या प्रेशर स्विंग एबझॉरब्शन (PSA) ऑक्सिजनला पीएम केअर्स अंतर्गत सहज वाहून नेणाऱ्या ऑक्सिजन उपकरणांची खरेदी आणि पीएसए सयंत्राच्या उभारणीमुळे मागणीच्या क्लस्टरजवळ ऑक्सिजन पुरवठ्यात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजन कारखाना ते रुग्णालयदरम्यान ऑक्सिजन वाहतुकीच्या सध्याच्या आव्हानाची दखल घेतली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button