राज्यावर म्युकोरमायकोसिसचा धोका; ठाकरे सरकारचा सावध पवित्रा; हाफकिनला दिली एक लाख इंजेक्शन्सची ऑर्डर

Rajesh Tope

मुंबई :- राज्यावर एकीकडे कोरोनाचे संकट आहे. तर दुसरीकडे म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) आजाराचा राज्यभरात वेगाने फैलाव होत असल्यामुळे आता ठाकरे सरकार कमालीचे सावध झाले आहे. हा आजार दुर्मिळ असल्याने राज्यात आतापासूनच त्यावरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटला म्युकोरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या एक लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले .

राज्य सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी (Remdesivir Injection) सहा कंपन्यांना तीन लाख इंजेक्शन्सची ऑर्डर दिली आहे. हा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे. याशिवाय, म्युकोरमायकोसिसचे रुग्ण वाढत असल्याने त्यासाठी हाफकिन संस्थेला एक लाख इंजेक्शन्सची ऑर्डर देण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

म्युकोरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून त्याबाबत तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत या आजारावर मोफत उपचार करता येतील का, याबाबत विचारविनिमय सुरू असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button