शिरोळमध्ये अपघातात वृद्ध ठार

Accident

कोल्हापूर : बस आणि सायकलच्या अपघातात वृद्ध जागीच ठार झाले. महावीर अप्पासो चौगुले (वय ६५ रा.शिरटी, ता. शिरोळ) असे मृत वृद्धाचे नाव आहे. घटनेची नोंद शिरोळ पोलीस स्थानकात झाली आहे. चालक रवींद्र बळवंत पाच्छापुरकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रवींद्र बळवंत पाच्यापुरकर हे बस (क्रमांक एम.एच.१४ बीटी १०८१) घेवून शिरोळहुन नृसिंहवाडीकडे जात होते. दरम्यान पाच्छापुरकर यांना जनता हायस्कुलजवळ रहदारीच्या रस्त्यावरील गर्दीचा अंदाज आला नाही. त्यामुळे बसच्या पाठीमागील बसून सायकलवरून जात असलेले महावीर चौगुले यांना धडक बसली. त्यामध्ये ते सायकलसहित खाली रस्त्यावर पडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. अधिक तपास शिरोळ पोलीस करीत आहेत.