वाहनाच्या धडकेत एकजण जखमी

Accident

ठाणे/प्रतिनिधी :- पूर्व द्रुतगती महामार्गावर एका वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी रविवारी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रोळी येथे राहणारे ईश्वार जाधव (३०) हे शुक्रवारी घोडबंदर येथून विक्रोळीच्या दिशेने जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या एका वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत ईश्वार यांना डोक्याला, पायाला मार लागून गंभीर दुखापत झाली. त्यानंतर रविवारी त्यांनी याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.