कोल्हापूर महापालिकेत दिवसात 1 कोटी घरफाळा जमा

Kolhapur Municipal Corporation

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत घरफाळा विभागाकडे गुरुवारी एक दिवसात 1 कोटी 01 हजार रुपये घरफाळा जमा झाला. कोल्हापूर शहरातील मिळकत धारकांना सन 2020-2021 या आर्थिक वर्षातील घरफाळा बिले महानगरपालिका संकेतस्थळावर ऑनलाईन पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी 1 कोटी टार्गेट दिले होते. आज दिवसभरात नागरी सुविधा केंद्रावर लोकांनी रांग लावून सुमारे 53 लाख 33 हजार इतकी रक्कम जमा केली असून ऑनलाइनद्वारे रुपये 5 लाख 48 हजार तर नागरी सुविधा केंद्रात रुपये 53 लाख 33 हजार इतकी रक्कम जमा केली आहे.

शिवाजी विधायपीठांचे कुलगुरू मा देवानंद शिंदे यांना 6 % सवलत योजनेची माहिती देऊन रक्कम भरणेची विनंती केली असता त्यानी त्वरीत 41लाख 20 हजारचा धनादेश दिला. त्यामुळे आज दिवसभरात महानगरपालिकाच्या तिजोरीत घरफळा जमे पोटी सुमारे 1कोटी 01हजार इतकी विक्रमी रक्कम दिवसात जमा झाली आहे. आजअखेर घरफाळा विभागाकडे सन 2020-21 या आर्थिक वर्षेसाठीस 6 कोटी 68 लाख इतकी विक्रमी जमा झाली आहे. नागरी सुविधा केंद्रावर सोसिएल डिस्टनसिंग चे मार्किंग करणेत आले असून सायनीटायजर सुविधा ठेवली आहे नागरिकांनी सहा टक्‍के सवलत योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याच्या दृष्टीने आपला घरफाळा लवकरात लवकर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे ही विनंती महापालिकेने केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER