मुंबई महापालिकेच्या मदतीला अभिनेता अजय देवगण सरसावला; कोविड रुग्णालयासाठी दिली एक कोटीची देणगी

Ajay Devgan

मुंबई : राज्यात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व स्तरांवरून मदतीचे हात पुढे येत असताना बॉलिवूडकरांनीही (Bollywood) मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसह (Ajay Devgan) अनेक बॉलिवूडकरांनी पुन्हा एकदा कोरोनाबाधितांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारले जात आहे. मुंबईतील दादर परिसरात कोरोनाबाधितांवर उपचार व्हावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील मुंबई महानगरपालिकेने कोविड एचडीयू रुग्णालय उभारले आहे. शिवाजी पार्कमधील स्‍काऊट-गाईड हॉलमध्‍ये २० रुग्‍णशय्या क्षमतेचे हे रुग्णालय आहे. हे रुग्णालय उभारण्यासाठी अजय देवगण मदत करत आहे.

या रुग्णालयात व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन सपोर्ट आणि इतर सुविधांचा समावेश असणार आहे. या कोविड सेंटरसाठी अजय देवगण त्याच्या NY फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत करणार आहेत. नुकतंच NY फाउंडेशनने सामाजिक उत्‍तरदाय‍ित्‍व म्‍हणून एक कोटी रुपयांची देणगी महानगरपालिकेकडे सुपूर्द केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button