दीड महिन्यात सुशांतची आत्महत्या की हत्या हे सीबीआय सांगू शकली नाही- अनिल देशमुख

Sushant Singh Rajput - CBI - Anil Deshmukh

मुंबई :- अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्युप्रकरणी मुंबई पोलीस (Mumbai Police) चौकशी करत असताना अचानक त्यांच्याकडून हे प्रकरण काढून केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) (CBI) सोपवण्यात आले. परंतु गेल्या गेल्या दीड महिन्यापासून सीबीआय तपास करीत आहे. त्यांनी केलेल्या चौकशीत सुशांतची हत्या झाली की आत्महत्या या निकालाची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत, असे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी म्हटले.

मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्यरीत्या आणि खोलात जाऊन तपास करीत होते. परंतु नंतर हा खटला सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. आता तुमच्या चौकशीलाही बराच वेळ झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर सांगा की, सुशांतची आत्महत्या झाली की हत्या? असे पुन्हा एकदा अनिल देशमुख यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER