श्वानांच्या लसीकरणासाठी दीड कोटी; राष्ट्रवादी म्हणाली, आधी माणसांचे लसीकरण करा

NCP - Thane Mahanagpalika - Maharashtra Today

ठाणे : राज्य सरकारने ६ मे २०२१ रोजी काढलेल्या अद्यादेशामध्ये केवळ कोरोना संदर्भातील उपाययोजनांसाठीच स्थायी समितीची बैठक घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र ठाणे पालिकेच्या स्थायी समितीमध्ये इतर विषयांवर चर्चा होत असल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी निदर्शनास आणली. विशेष म्हणजे, शुक्रवारी संपन्न झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अनावश्यकरित्या श्वानांच्या लसीकरणासाठी दीड कोटी रुपयांची मंजुरी घेण्यात आली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी आयुक्तांची भेट घेऊन आक्षेप घेतला.

ठाणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीची बैठक शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच आयत्यावेळाच्या विषयांवरुन विरोधी पक्षनेत्यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला कोविड व्यतिरिक्त विषयांची भरमार विषयपत्रिकेत असल्याचा दावा करीत विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही प्रशासनाने ही बैठक सुरुच ठेवल्यामुळे संतापलेल्या पठाण यांनी सभात्याग करीत थेट आयुक्तांचे दालन गाठले. आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना शासनाच्या जीआरची अवहेलना होत असल्याची बाब त्यांनी सांगितली.

दरम्यान, एकीकडे ठाण्याची आरोग्य व्यवस्था अत्यंत हतबल ठरत आहे. माणसांना लस उपलब्ध होत नाही. मात्र, श्वानांच्या लसीकरणासाठी प्रती लस १६५० रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे, ठाणे शहरातील श्वानांची संख्याच ज्ञान नसताना १ कोटी ४७ लाख ६० हजार रुपयांची तरतूद कोणत्या आधारावर केली? तसेच, एकीकडे कोरोनामुळे मुले बागेमध्ये खेळायला जात नाहीत. तरीही, बागेच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद पालिका प्रशासन का करीत आहे? असा सवालही शानू पठाण यांनी यावेळी केला. आयुक्तांच्या मुद्द्यांनी आपले समाधान झालेले नाही. शासनाच्या जीआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे ही बैठक बेकायदेशी आहे. त्यामुळे आयुक्तांनी आपणांसह स्थायी समिती सभापती संजय भोईर, राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, भाजपचे गटनेते आणि विधी सल्लागार यांची संयुक्त बैठक बोलवावी, अन् त्यामध्ये याबाबत चर्चा करावी. जर, शासनाचा अद्यादेश योग्य असेल तर पारीत करण्यात आलेले सर्व ठराव रद्द करावेत,” अशी मागणी शानू पठाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button