सुरेशदादांना जामीन, खडसेंचा वाढदिवस… निव्वळ योगायोग!

जळगाव : शिवसेनेचे नेते आणि जळगावचे बडे नेते सुरेश जैन यांना तब्बल साडे चार वर्षांनंतर जामीन मंजूर झालाय… आणि निव्वळ योगायोग म्हणजे आज एकनाथ खडसे यांचा वाढदिवस आहे.

जैन विरुद्ध खडसे वाद

जळगाव घरकूल घोटाळ्यातले आरोपी सुरेश जैन यांना जामीन मिळणं, ही महाराष्ट्राच्या राजकारणातली एक महत्त्वाची घटना आहे. गेल्या साडे चार वर्षांपासून वारंवार अर्ज करूनदेखील जैनांना जामीन मिळत नव्हता. जळगावचे भाजप नेते एकनाथ खडसे आणि सुरेश जैन यांच्यातल्या राजकीय संघर्षाला तर अनेक वर्षांची पार्श्वभूमी आहे. त्यात खडसे मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर जैनांना जामीन मिळण्याची शक्यता अधिकच धूसर झाली होती.

अजब योगायोग

मात्र खडसेंना मंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं आणि सुरेश जैनांना जामीन मंजूर झाला. विशेष म्हणजे एकनाथ खडसेंचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवशीच सुरेश जैनांना जामीन मिळावा, हादेखील एक अजब राजकीय योगायोग मानला जातोय.