राजू शेट्टींचा ‘स्वाभिमानी’ यूपीएमध्ये सहभागी

नवी दिल्ली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी संयुक्त प्रग्रतीशील आघाडीत सहभागी होण्याची घोषणा केली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर शेट्टी यांनी ही घोषणा केली.

चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एनडीएला सोडचिठ्ठी दिली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही यूपीएमध्ये सहभागी झालो असल्याचे सांगत राजू शेट्टी यांनी यूपीए सहभागाची घोषणा केली. 2019 ची निवडणुक युपीएचा घटकपक्ष म्हणून लढवणार असल्याची घोषणाही राजू शेट्टी यांनी केली. विशेष म्हणजे भाजपच्या धोरणांवर आगपाखड करणाऱ्या राजू शेट्टींनी याआधीच रालोआला सोडचिठ्ठी दिली आहे.