मुख्यमंत्र्यांनी रावणाप्रमाणे गर्व करू नये : नाना पटोले

शिर्डी : मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान, ‘भाजपचा आवाज कोणही दाबू शकत नाही’ यावर टिका करताना माजी खासदार नाना पटोले मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख टाळत रावणाचे उदाहरण देताना म्हणाले, त्यांच्यासारखा कुणीही गर्व करून नये.

खडसे, राणे या बहुजन नेत्यांना संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. छगन भुजबळ केवळ याच कारणास्तव आत आहेत. डाकू लोकांचे काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थीत केला. राष्ट्रीय ओबीसी जनगणना परिषदेसाठी आलेल्या पटोले यांनी पत्रकारांशी बोलतांना राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केली. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळली नसून शेतक-यांचा विश्वासघात केला आहे. यामुळेच शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. लोकशाही संविधानावर चालली पाहिजे. सध्या मात्र एका विचाराचा अजेंडा राबवला जात आहे. पाच-दहा टक्के नागरिक समाधानी असतील पण नव्वद टक्के जनता नाराज आहे.