मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे तरुणांना हेल्मेट घालण्याचे आवाहन!

मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानाबाहेरही आपली कामगिरी चोख बजावताना दिसतोय. सचिन तेंडुलकरने नुकताच आपला एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय. यात तो वाहन चालकांना हेल्मेट घालण्याचे आवाहन करतोय.

सचिन आपल्या गाडीतून जाताना बाइकवर चाललेल्या तरुणांना हेल्मेट घाला असे सांगतोय. सचिनच्या या आवाहनाकडे कनाडोळा करत त्याचे चाहते मात्र सेल्फि घेताना या व्हिडिओत दिसत आहेत. ‘जीवन अनमोल आहे, हेल्मेट वापारा’, असं सचिन सर्वांना सांगतोय.

आदर्श ग्राम योजना असो की स्वच्छ भारत अभियान खासदार सचिन तेंडुलकरने यात पुढाकार घेऊ अशाच प्रकारे आपली सामाजिक जाणीव दाखवून दिली आहे. आता हेल्मेटचे घालण्याचे आवाहन करताना सचिन दिसतोय. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.