भरधाव वाहन धडकेच्या दोन घटना -दोनजण जखमी

ठाणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन करून भरधाव वाहन चालवून घडलेल्या धडक देण्याच्या दोन घटना विविध ठिकाणी घडल्या. दोनजण जखमी झाले आहेत. या दोन घटना कळवा आणि कापुरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असून वाहन चालकाच्या विरोधात गुन्हे दाखल करणायत आलेल आहेत.
           फिर्यादी सुहास उचेगावकर(४१) रा. शिवलीला वाधवा हाईट्स पहिला माळा डी मार्ट खडकपाडा कल्याण हे आपल्या दुचाकीवरून पारसिक सर्कल येथून उजव्या बाजूला वळण घेत असताना मुंब्रा बाजूने आलेल्या भरधाव कंटेनर दिलेल्या धडकेत फिर्यादी उंचेगावकर यांचा पाय फेक्चर झाला.  या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात आरोपी वाहनचालक शैलेंद्र रामदेव पाल (२३) सीमा बल्क कॆरियर्स ट्रान्सपोर्ट कंपनीचा कंटेनर चालवीत होता. त्याच्यवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात  आली .
अपघाताची दुसरी घटना कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत साकेत ब्रिजजवळ घडली. फिर्यादी सुरेंद्र प्रतापसिंह शोभासिंह(४१) रा. सावरकर नगर ठाणे हे गुरुवारी मुंब्रा येथून दुचाकीने नाशिक मुंबई महामार्गावरून जात असताना साकेत ब्रिजजवळ अज्ञात वाहनाने भरधाव वाहन चालवीत दुचाकीला धडक दिली यात मोटरबाईकचे नुकसान झाले आणि फिर्यादी सुरेंद्र हे जखमी झाले. वाहनचालकाने त्यांना उपचारासाठी दाखल न करताच पोबारा केल्याने कापूरबावडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.