पोळ्याच्याच दिवशी तलावात बुडून मुलाचा मृत्यू

भंडारा : पोळ्याच्या निमित्तानं बैलांना आंघोळ घालण्यासाठी तलावावर गेलेल्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झालाय.

लाखांदूर तालुक्यातील विरली खंदार गावात ही घटना घडलीय. महेश ब्राम्हणकर असं या 17 वर्षीय मृत मुलाचं नाव आहे.

महेश आणि त्याचा लहान भाऊ असे दोघे जण बैल धुण्यासाठी तलावावर गेले होते. मात्र, महेशला पाण्याचा अंदाज न आल्यानं तो तलावातील खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला… आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

ऐन पोळ्याच्या सणाच्या दिवशीच ही घटना घडल्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.