पार्किंग कारची काच फोडून २० हजाराची रोकड लांबविली

ठाणे : नौपाडा ब्राह्मण सोसायटीच्या परिसरात व्हेगनर कर पार्किंग केली असता अज्ञात चोरट्याने कारची काच फोडून कारमधील २० हजाराची रोकड घेऊन पोबारा केला. नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.
              फिर्यादी अतुल सूचित जयेंद्र पेठे (३३) सेव्हन स्टार कॉ ऑप सोसायटी नौपाडा येथे व्हेगनर कर पार्किंग कार्नाय्त आली  होती. बुधवारी रात्री पार्किंग केलेल्या कारची समोरील डाव्या बाजूची कारची काच फोडून कारमध्ये ठेवलेली २० हजाराची रक्कम हि अज्ञात चोरट्याने लांबवली. गुरुवारी सकाळी सादर प्रकार उघडकीस आला. पेठे यांनी त्वरित नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा नोंदविला. नौपाडा पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.