नौपाडा-वागळे परिसरात वाहनचोरीच्या दोंन घटना

ठाणे : नौपाडा पोलीस ठाण्याच्या  हद्दीत सर्व्हिसरोडवर पार्किंग केलेली रिक्षा तर वागळे परिसरात हमरस्त्यावर पार्किंग केलेली स्कुटर अज्ञात चोरटयांनी लांबविल्याचे दोन गुन्हे विविध पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले आहेत. पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.
फिर्यादी सुरेशचंद्र हेमचंद्र पांचाळ(५४)रा. सावरकरनगर, ठाणे यांच्या मालकीची टीव्हीएस ज्युपिटर स्कुटर शिवसेना शाखा जयभवानी नगर येथे पण टपरीच्या समोर लोक करून ठेवली असता आडनायत चोरट्याने लॉक तोडून स्कुटर घेऊन पोबारा केला. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस शोध घेत आहेत.
        दुसरी रिक्षा चोरीची घटना नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. फिर्यादी संतोष विठ्ठल वानखेडे(३८) कन्नमवार नगर, शिवछया झोपडपट्टी, विखरवली पूर्व हे आपली ५० हजार रुपये किमतीची रिक्षा घेऊन प्रवासी याना सोडण्यासाठी ठाण्यात आले होते. नौपाडा सर्व्हिस रोडवरून जाताना गुरुद्वारा समोरून कोपरीकडे जात असताना सार्वजनिक शौचालयाच्या समोर रिक्षा उभी केली असता अज्ञात चोरट्याने रिक्षा घेऊन पोबारा केला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल कार्नाय्त आला आहे . नौपाडा पोईस रिक्षा चोरट्याचा शोध घेत आहेत.