‘नेहरु-गांधी-लोहियांचेही महिलांशी संबंध’

नवी दिल्ली : अश्लील सिडी प्रकरणात अडकलेल्या संदीप कुमारची पाठराखण करण्यासाठी आप नेते आशुतोष यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. संदीप कुमारनं काहीच चुकीचं केलं नसल्याचा दावा आशुतोष यांनी केला आहे.

परस्पर सहमतीने दोन व्यक्तींमध्ये शारीरिक संबंध होत असतील तर यामध्ये चुकीचं काय असा सवाल आशुतोष यांनी उपस्थित केला आहे. संदीपनं कुणालाही पळवलं नाही आणि दोघंही एकमेकांना ओळखत असल्याचं सीडीतून स्पष्ट होत असल्याचं आशुतोष यांनी म्हटलं आहे.

संदीप कुमारला वाचवण्यासाठी आशुतोष यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि राममनोहर लोहिया यांच्यावर सवाल उपस्थित केला आहे. नेहरु, गांधी यांचेही महिलांशी संबंध होते असा धक्कादायक आरोप आशुतोष यांनी केला आहे. आता या थोर महापुरुषांवर आरोप करुन आपवरील दाग धुतले जाणार का हा प्रश्न अनुत्तरित आहे.