निवडणुकीच्या तोंडावर भाजपा अडकले विवादात

Goa Polls

गोवा : गोव्यात सत्तेत असलेली भारतीय जनता पक्ष येणं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विवादात अडकल्याचे चित्र दिसत आहे. संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वामुळंच भाजपला गोव्यात सत्ता आली पण पक्षातीलच आणि सरकार व्यवस्थापन व्यवस्थित नसल्यानं तिथे वादंग निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकीसाठी गोव्यात भाजपसमोर, विरोधक कॉंग्रेस व ‘आप’ यांचे मोठे आव्हान आहे.

भाजप राज्याचे निवडणूक वर्तमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. गोव्याचे वर्तमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे स्वत: च्या मतदारसंघात, मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर आल्यानंतर त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा रोष आहे. त्यांच्या अनेक वादग्रस्त विधानांमूळ गोव्यातील नागरिकांनी त्यांना ‘वाचाळ ‘ असे टोपण नाव ही दिले आहे. एकदा आंदोलन करणाऱ्या परिचारिकांच्या वेळीतर त्यांनी वादग्रस्त विधान केले होते ते म्हणजे “उन्हात बसलात तर काळ्या व्हाल, मग तुम्हाला लग्नासाठी नवराही मिळणार नाही ” गोवा आपल्या समुद्र किनाऱ्यांमुळं भारतीय तसेच विदेशी पर्यटकांना आकर्षित करतो.

गोव्याचे उत्पन्न हे पर्यटन आणि मासेमारी यावर अवलंबून असून ,येथे हिंदू 66.08% आणि ख्रिस्ती 25.10% लोक राहतात. गोवा हा तेथील किनाऱ्यांसाठी आणि आकर्षक शैकने ओळखला जातो. परंतु येथील शैक मालकांचा शासनावर मोठा राग आहे. कारण पूर्वी या शैक अर्जाच्या प्रक्रियेसाठी 10 रुपये लागायची मात्र, आता या शैक परवान्यासाठी या वर्षी त्यांना 9000 रुपये भरावी लागले आणि मंजुरीसुधा त्यांना २ महिन्यानंतर मिळाली. लॉटरी पद्धती त्यांनी वापरल्यामुळं काही जणांना एकावेळी सात परवाने मिळाले आणि जो परवाना पूर्वी एका वर्षासाठी दिला जायचा तो आता ३ वर्षासाठी दिला जातोय. नोटाबंदीचा फटका गोव्यातील पर्यटनाला ही बसला आहे, त्यामुळं यावेळी येथील पर्यटन क्षेत्राला मोठं नुकसान झालं आहे.

२०१२ मध्ये भाजप सत्तेत येण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यावेळी भाजपने आपल्या जाहीर केलेल्या घोषणापत्रात ५०००० रोजगार देऊ असं म्हटले होते. परंतु तज्ज्ञांच्या मते, यात भाजप पूर्णपणे अयशश्वी झाली आहे, या उलट आता त्यांचं म्हणणे आहे की, खाजगी क्षेत्रात स्थानिक युवकांना 80% रोजगार देणे योग्य ठरणार नाही. यामुळं भाजपच्या विरोधात स्थानिक युवकांमध्ये राग असल्याचं आप पक्षाच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळं आता ‘आप युवक योजना’ काढन्याचि घोषणा केली आहे. या अंतर्गत २१ वर्षावरील बेरोजगार युवकांना ५००० रुपये मासिक भत्ता प्रदान केली जाईल. नवीन मच्छिमार्केट्चे निर्माण तसेच मासेमारीत एलईडी दिव्यांचा वापर हे सगळे बदल होत असल्यानं स्थानिक मच्छिमाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मच्छिमाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शासनाने त्यांच्या मागण्या ऐकून न घेता, त्यांच्यावर लाठीमार केला आहे.

महिला मदतरांचा भक्कम पाठींबा म्हणजे भाजपाची जमेची बाजू होती. त्यावेळी महिलांचा याकरिता पाठिंबा होता कारण, शासनाने “गृह आधार योजने ” अंतर्गत महिलांना १५०० रुपयांपर्यंत अर्थसाहाय लागू केले होते. परंतु आता लोकांना अशी शंका येऊ लागली आहे की, पाणी आणि वीज बिलामध्ये ५ पट वाढ करून शासन त्यांच्या मेहनतीच्या कमाईवर डल्ला मारून, हाच पैसा विविध योजनेमधे वापरून सामान्यांची दिशाभूल करित आहे. फादर बिस्मार्क यांनी सेझ आणि नवीन विमानतळाला केलेला तीव्र विरोध आणि त्यानंतर त्यांचे ‘मांडवी’ नदीत सापडलेले, कुजलेले प्रेत आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ता रवींद्र वेलीप याने कावराम गावात अवैध कोळसा खाणींना केलेल्या विरोधामुळं, त्याच्यावर करण्यात आलेला प्राणघातक हल्ला प्रकरणामुळं भाजपाची प्रतिमा, स्वयंसेवी संस्था तसेच माध्यमांनी धुळीस मिळवली आहे.

त्यामुळं ख्रिस्ती समाज संतापलेला असून, त्यांची मते आणि पाठिंबा आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार एल्विस गोम्स अथवा काँग्रेसला जाण्याची दाट शक्यता आहे. आप ने गोव्यातील स्थानिक युवकांच्या,पर्यटकांच्या तसेच मच्छीमारांच्या मुद्द्यांना चांगल्या प्रकारे वाचा देउन, रणनीतिकखेळा पृमाणे भाजपचा गोव्यातील चेहरा असलेले मनोहर पर्रीकर यांच्यावर टीकांच सत्र सुरु केलं आहे. काँग्रेससुद्धा भाजपवर टीका करण्याची कुठलीही संधी सोडत नाही आहे. भाजपाला या निवडणुकीत मतविभागणीला सामोरे जावे लागणार आहे.

कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांचे मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याच्या मुद्यांवरून आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे अनुदान नूतनीकरण करण्याच्या मुद्यांवरून भाजपसोबत मतभेद झाल्यामुळं त्यांनी ‘गोवा सुरक्षा मंच’ नावाचा नवीन पक्ष स्थापन केला आहे. सुभाष वेलिंगकर हे गोव्यातील संघाचे लोकप्रिय चेहरा होते. त्यामुळं त्यांना संघाच्या कार्यकर्त्यांचा छुपा पाठिम्बा आहे, तसेच संघाचे गोव्यातील संघचालक लक्ष्मण बेहरे यांनी असं व्यक्तव्य केलय की, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही विशिष्ट पक्षाला पाठिम्बा देण्यास सांगणार नाही. या वादळातून भाजपला सावरण्याची आणि भाजपला तारण्याची जबाबदारी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या खांद्यावर आहे.