नागपुरात पावसाचे 3 बळी, पिपळा येथ 450 बालकांना बोटीच्या सहाय्याने काढले.

नागपूर: मुसळधार पावसामुळे नागपूरमधील सर्वसामान्‍यांचे जीवन थांबले 3 जणांचा मृत्यू झाले. वीज कोसळल्‍याने दोन जणांचा मृत्‍यू झाला आहे तर हुडकेश्‍वर नाला येथे एका व्‍यक्‍तीचा मृतदेह आढळून आला आहे.

पावसामुळे नागपूरमध्‍ये सर्वत्र हाहाकार उडाला असून शहरी व ग्रामीण भागात आतापर्यंत ऐकूण 135 लोकांना बचाव पथकाने वाचवल्‍याची माहिती आहे. तसेच पिपळा येथे आदर्श संस्‍कार विद्यालयात पुराच्‍या पाण्‍यात अडकलेल्‍या 450 विद्यार्थ्‍यांना बोटीच्‍या साहाय्याने सुरक्षितरीत्‍या बाहेर काढण्‍यात आले आहे. राष्‍ट्रीय आपत्‍ती व्‍यवस्‍थापन दलाच्‍या जवानांनी या विद्यार्थ्‍यांना बाहेर काढले.