नांदेड येथील बलात्कार प्रकरणी तिघांना अटक; मौलाना पसारच

माजलगाव /नांदेड: नांदेड येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीला वाचविणारे माजलगाव येथील भाजपचे नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व एमआयएमचा तालुकाध्यक्ष अशा तिघांवर येथील पोलिस स्टेशनमध्ये विनयभंग तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधित कायद्यानुसार गुन्हा नोंदविला आहे. त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चुनाभट्टी देगलूर नाका परिसरातील मदरशामध्ये माजलगावातील काही मुली शिक्षण घेत आहेत. येथील मौलाना साबेर फारूखी यांने एका मुलीवर बलात्कार केल्याचे मुलीने आई-वडिलांस सांगितल्यानंतर आरोपीला मौलानाला माजलगावच्या लोकांनी चांगलेच बदडले.

मुलीच्या आईने थेट नांदेड येथील इतवारा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मौलाना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा भाजपचे माजी नगरसेवक खलील पटेल, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष नवाब पटेल, एमआयएमचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष इद्रिस पाशा यांनी मौलानाच्या विरोधात तक्रार देणाऱ्या मुलीच्या नातेवाइकास अडथळा आणून विरोध केला होता. त्यामुळे या गुन्ह्याबाबत मौलानाला अप्रत्यक्षरीत्या मदत करणाऱ्या माजलगाव येथील पाच जणांना नांदेड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

दरम्यान, इतवारा पोलिसांनी खलील गणी पटेल, नवाब पटेल, इद्रिस पाशा बागवान यांच्यासह मौलानाची पत्नी हाजरा साहिन फारुखी व मौलाना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपींना ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.