दीपिकाच्या ‘xXx: रिटर्न ऑफ झेंड केज’ ने केली 20162 कोटीची कमाई

xxx return of the xander

मुंबई: दीपिका पादुकोनचा पहिला हॉलिवूड चित्रपट ‘xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज’ ने संपूर्ण विक्रम मोडीत काढत जगभरातून 308 मिलियन डॉलर अर्थात 20162 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 14 जानेवारी रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाल्यानंतर तिकीटखिडकीवरील सर्व रेकॉर्ड तोडत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट झाला ठरला आहे.

दीपिकाच्या या चित्रपटाला चीनमध्ये सर्वाधिक पसंती मिळाली आहे. चीनी बॉक्सऑफिसवर या चित्रपटाने पहिल्या दहा दिवसात 137 मिलियन रुपयाचा गल्ला जमवला आहे. चीनमध्ये एकाचवेळी 6600 पडद्यावर हा चित्रपट प्रदर्शित झाला. चीनमध्ये प्रदर्शनाला सर्वाधिक कमाई करणारा हा हॉलिवूडपट ठरला आहे.

‘xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज’ मध्ये दीपिकासोबत 48 वर्षीय विन डीजेलने यामध्ये ‘Xander Cage’ ची भूमिका निभावली आहे. तर दीपिका ‘Serena’च्या भूमिकेत आहे. दीपिकाच्या बाजीराव-मस्तानीने जगभरात 360 कोटींची कमाई केली होती.