दिग्दर्शक रवी जाधवच्या ‘न्यूड’ला सेन्सॉरकडून ‘अ’ प्रमाणपत्र !

मुंबई : दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘न्यूड’ चित्रपटाला सेंसॉर बोर्डाने कोणताही कट न सूचवता अ प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे न्यूड चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. रवि जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ या सिनेमाला ४८ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी) वगळण्यात आल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. तसेच या मुद्द्यावरून सेंसॉर बोर्ड आणि सरकारवर जोरदा टीकाही झाली होती.

दरम्यान, सेंसॉर बोर्डाने न्यूड चित्रपटातील कोणतेही दृश्य न कापता प्रमाणपत्र दिल्याबद्दल रवी जाधव यांनी फेसबूक पोस्टमधून सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच विद्या बालन यांच्या अध्यक्षतेखालील सीबीएफसीच्य्या विशेष ज्युरी मंडळाने आमच्या कामालचे कौतुक केल्याचेही रवी जाधव यांनी फेसबूक पोस्टमध्ये नमूद केले आहे.

रवि जाधव दिग्दर्शित ‘न्यूड’ या सिनेमाला ४८ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी) वगळण्यात आले होते. तेरा ज्युरी मेबर्सनी एकुण २६ सिनेमांची इंडियन पॅनोरमा विभागासाठी निवड केली होती. पॅनारोम विभागात न्यूड सिनेमाचं स्क्रीनिंग होणार होतं. पण माहिती व प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या यादीतून या सिनेमाला वगळण्यात आले. सिनेमाच्या नावावर आक्षेप घेत या सिनेमाला यादीतून वगळल्याची माहिती समोर आली होती.

दिग्दर्शक रवि जाधव यांचा ‘न्यूड’ हा सिनेमा न्यूड मॉडेल म्हणून काम करणाऱ्या एका तरूण स्त्रीच्या जीवनावर आधारीत आहे. चित्रपटाला इफ्फीतील स्क्रीनिंगमधून वगळल्यानंतर रवी जाधव यांनी निराशा व्यक्त केली होती.