जगातला एकमेव पांढरा नर गेंडा आता इतिहास जमा

नवी दिल्ली : जगातला एकमेव असा असलेला पांढरा गेंडा ‘सुडान’ चा मृत्यू झालेला आहे . केनिया च्या ओआइ पेजेंटा अभयारण्य ने दिलेल्या माहिती नुसार ४५ वर्षीय गेंड्या ची प्रकृती गरजे पेक्षा जास्त खराब झाल्या मुळे त्याला मृत्यू चे औषध दिल्या गेले . त्याच्या मांसपेशी आणि हाडे कमजोर झाले होते . इतकेच काय तर त्याच्या त्वचे वर हि घाव झाले होते .

खराब प्रकृती मुळे सुडान २ हप्ते उठू हि शकला नव्हता . हा नर गेंडा दोन जिवंत मादा गेंड्या च्या मदतीने विलुप्त होणाऱ्या या प्रजातीला वाचविण्या साठी एका महत्व पूर्ण प्रयत्ना चा हिस्सा राहिला आहे . एके काळी सुदान अतिशय लोकप्रिय होता . त्याला पाहण्यासाठी दूर दुरुन हजारो लोक यायचे . पण आता हा पांढरा नर गेंडा इतिहास जमा झाला आहे .