… आणि नागपूरहून निघणारी विशेष रेल्वे फक्त १५ कार्यकर्त्यांना घेऊन मुंबई ला गेली !

नागपूर : भाजपच्या वर्धापन दिना निमित्त नागपूर च्या कार्यकर्त्यांना मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला जाण्यासाठी नागपुरसह वर्धा येथून विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले होते. भाजप च्या या वर्धापन दिनाच्या भव्य कार्यक्रमासाठी हजारो लोक मुंबईला जाणार होते.

त्यासाठी कार्यकर्त्यांना या विशेष रेल्वेची वेळ ही आज सकाळी १० .३० वाजताची सांगण्यात आली होती. पण प्रत्यक्षात मात्र या रेल्वेची वेळ ही ८:१८ मिनिटाची होती. रेल्वे प्रशासनाने नियोजित वेळेनुसार ती रेल्वे मुंबईकडे रवाना केली. यावेळी भाजपचे केवळ १५ कार्यकर्ते स्थानकात हजर होते. तेवढ्याच कार्यकर्त्यांना घेऊन ही विशेष रेल्वे मुंबईकडे रवाना झाली. या सर्व प्रकारा नंतर भाजपा च्या कार्यकर्त्यांनी याचे खापर रेल्वे प्रशासनावर फोडले आहे. इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागपुरातच राहिल्याने परत रेल्वे ने दुसरी विशेष रेल्वे उपलब्ध करून दिली.