आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना सरकारी नोकरी : रामदास आठवले

ramdas-athawale

सांगली: आंतरजातीय विवाहामुळे समाजातील जाती-पातीच्या भिंती नष्ट होऊन एकोपा निर्माण होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दोघांपैकी एकाला सरकारी नोकरी देण्याचा विचार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

नोकिरीशिवाय त्यांच्या घरगुती अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. सांगली जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार आठवले यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.