अल्पवयीन मुलीचा सौदा करण्यासाठी दिले गेले हार्मोन्सचे इंजेक्शन

अमरावती : महाराष्ट्रा एक सेक्स स्कँडल उघड झाल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आलीय. या सेक्स स्कँडलमध्ये एका मुलीची सुटका करण्यात आलीय.

अमरावतीची रहिवासी असलेल्या भूमीला (बदललेलं नाव) अकाली तरुण बनवण्यासाठी हार्मोन्सचे इंजेक्शन दिले गेले… तिच्या शरीराला विकण्यासाठी हे अघोरी कृत्य करणाऱ्यांचा अखेर पर्दाफाश झालाय.

शिक्षण सुटलंच आणि…

केवळ सात वर्षांची असताना भूमीच्या आई-वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर ती आजी-आजोबांसोबत राहत होती. यानंतर तिच्या पुढच्या शिक्षणासाठी म्हणून तिच्या एका नातेवाईक महिलेनं तिला आपल्यासोबत अमरावतीला आणलं…

अमरावतीला आल्यानंतर भूमीचं शिक्षण तर सुटलंच पण तिला एका महिलेला विकण्यात आलं. तेव्हा भूमी केवळ १५ वर्षांची होती… लहान शरीर असल्यानं कुणीही तिच्यावर जास्त बोली लावण्यास तयार नव्हतं.. त्यामुळे तिला अकाली तरुण करण्यासाठी तिला हार्मोन्सचे इंजेक्शन आणि औषधं दिली जाऊ लागली. त्यामुळे, भूमी लवकरच २० वर्षांची दिसू लागली.

वारंवार अत्याचाराला बळी…

यानंतर भूमीला खातेगावच्या राहुल सेठी नावाच्या व्यक्तीला विकण्यात आलं. त्यानं वारंवार या मुलीवर अत्याचार आले. भूमीनं कशीबशी त्याच्या तावडीतून सुटून पोलीस स्टेशन गाठलं… तिच्या अत्याचाराची कहाणी ऐकताना पोलिसांच्याही अंगावर काटा उभा राहिला.

डॉक्टरांच्या अहवालात भूमीला हार्मोन्सचे इंजेक्शन्स आणि औषधं दिल्याचं सिद्ध झालंय. पोलिसांनी या प्रकरणात राहुल सेठी आणि त्याचा बाप राजू सेठी यांना अटक केलीय.