अभिनेते शेखर सुमनच्या विरोधात करणी सेनेचं आंदोलन

Shekhar Suman

मुंबई : ‘पद्मावती’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांना मारहाण केल्याप्रकरणी अख्या बॉलिवूड मधून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या. यातच अभिनेते शेखर सुमन यांनी सुद्धा या घटनेचा निषेध करत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा इशारा दिला होता. यावरूनच सुमन यांच्या या प्रतिक्रियेने आगबबूला झालेल्या राजपूत करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी चक्क मुंबई गाठून शेखर सुमन यांच्या लोखंडवाला परिसरातील घरासमोर आंदोलन केलंय.

गुजरात आणि राजस्थानवरुन रविवारी सकाळी राजपूत करणी सेनेचे कार्यकर्त्यांनी मुंबईत येऊन शेखर सुमन यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. मात्र यावेळी शेखर सुमन घरी नसल्यानं आपण पुन्हा येऊन आंदोलन करू सोबतच सुमन याना पब्लिसिटी काय असते ? हे दाखवून देऊ असा इशारा ही दिला आहे.

दरम्यान ,’ काही दिवसांपूर्वी जयपूरमधील जयगडमध्ये ‘ पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान सेटवर या चित्रपटातील काही दृश्य चुकीचे चित्रित केल्याचा दावा करत दिग्दर्शक संजय लीला भन्साली याना करणी सेनेने मारहाण केली होती.

HACKED BY SudoX — HACK A NICE DAY.