अजित पवार म्हणाले…आजी मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांची केली अशी अवस्था

नांदेड: नारायण राणेंची अवस्था म्हणजे आगीतून फुफाट्यात अशी झाली असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राणे आता हताश झाल्याचे सांगून पवार म्हणाले, मंत्री करण्यासाठी त्यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांनाच धमकी दिली आहे. राणे म्हणात, मी मुख्यमंत्री होतो, मला मंत्री तरी करा, असे म्हणताना त्यांनी राणेंची खिल्ली उडवली. आजी मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांची, अशी अवस्था केल्याचे पवार म्हणाले.

‘भाजपने राणेंना गाजर दाखवले आहे. भाजपचे निवडणूक चिन्ह बदलून गाजर केले पाहिजे.’ असा टोलाही अजित पवारांनी लगावला. ते नांदेडमधल्या एका सभेत बोलत होते.

इकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचीही खिल्ली उडवताना पवार म्हणाले, ‘जानकरांना त्यांच्या खात्यातले काहीच कळत नाही.