अकोला जिल्ह्यात ‘गुडफ्रायडे’ उत्साहात साजरा

अकोला : प्रभू येशू ख्रिस्तांनी अखिल मानव जातीच्या पापक्षालनासाठी क्रुसावर दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून जगभरात गुडफ्रायडे हा सण साजरा केला जातो. यावेळी अकोला शहर आणि जिल्ह्यातील सुमारे ३० चर्चमध्ये प्रार्थनासभांचे सकाळी आणि दुपारी आयोजन करण्यात आले. खदान ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चमध्ये शुक्रवारी दुपारी १२ ते ३ या वेळात आयोजित प्रार्थनासभेमध्ये, प्रभू येशू ख्रिस्तांना क्रुसावर चढवण्यात आले असता उच्चारलेल्या ७ वाक्यांवर बायबलच्या अभ्यासकांनी प्रकाश टाकला. याप्रसंगी संडेस्कूल, महिला संघ, तरुण संघाच्या सदस्यांनी गुडफ्रायडेवर आधारित गीते सादर केली.